🛡️ शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र)
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांच्या सूचनेनुसार, पालघर जिल्हा अध्यक्ष मा. राजेंद्र मु. वेदांत, वसई तालुका अध्यक्ष मा. जगदीश एम. ओझा, वसई तालुका संपर्क प्रमुख मा. पियूष एम. धरोड तसेच सभासद हसमुख सी. दरजी, कनैयालाल बी. आसर आणि ओम उपाध्यक्ष यांच्या वतीने सहायक आयुक्त कार्यालय, तुळींज विभाग तसेच तुळींज पोलीस स्टेशन येथे भेट देऊन मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साहेब तसेच पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 🇮🇳🌹
देशभक्तीच्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करताना राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला.
🤝 पोलीस–जनता समन्वय अधिक दृढ करण्यासाठी शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) सदैव तत्पर!
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
·
Admin User