पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक (SP) श्री संदीप सिंह गिल साहेब यांचा सन्मान 💐
पीसकिपर वेल्फेयर फाउंडेशन – शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक (SP) श्री संदीप सिंह गिल साहेब यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नसरापूर (भोर) येथील अल्पवयीन चिमुकलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने, प्रभावीपणे आणि यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. विशेष न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून, पोलिसांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल साहेब यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
📍 यावेळी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेद सुथार, कोर कमिटी सचिव मा. श्री. विनोद जोपिंग तसेच पुणे शहर सचिव मा. श्री. शेखर पवार उपस्थित होते.
👏 पुणे ग्रामीण पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र)
·
Admin User