Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Peacekeepers Welfare Foundation Peacekeepers Welfare Foundation
Activity

पालखी प्रस्थान सोहळ्यात समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम

·
संस्थापक अध्यक्ष मा. उमेदभाऊ सुथार यांच्या सूचनानुसार नाशिक रोड येथील जय भवानी रोड, तुळजाभवानी मंदिर येथे आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पालखीचे संस्थेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी भाविकांना प्रसादाचे वाटप करून सेवा व समर्पणाचा संदेश देण्यात आला.
पीसकीपर्स वेल्फेअर फाउंडेशन – शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने वारकरी भाविकांसाठी विविध समाजोपयोगी सेवा उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रेमपूर्वक खाऊ वाटप, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, आवश्यक मार्गदर्शन तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य अशा विविध जबाबदाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी व पोलीस मित्रांनी अत्यंत शिस्तबद्ध, संयमाने आणि निस्वार्थ भावनेने पार पाडल्या.
🙏 "सेवा हीच खरी ईश्वरसेवा" या ब्रीदवाक्याला साजेशा सेवाभावातून संस्थेच्या सर्व सदस्यांनी पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले. वारकरी भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या शुभेच्छाच संस्थेच्या सेवाकार्याची खरी पावती ठरल्या.
🌹 या सेवाकार्यात सक्रिय सहभाग नोंदविणारे मान्यवर पदाधिकारी :
🔹 उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्षा – सुनीता जाधव
🔹 नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष – भास्कर शेलार
🔹 नाशिक शहर प्रमुख – सचिन गायके
🔹 नाशिक शहर महिला प्रमुख – सीमा शर्मा
🔹 नाशिक शहर महिला उपाध्यक्षा – अनिता जाधव
🔹 नाशिक रोड विभाग महिला उपाध्यक्षा – स्मिता साळवे
🔹 नाशिक जिल्हा सभासद – हर्षदा महाजन, गुरुदत्त महाजन, वैभव पाटील, छाया चौधरी
या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व स्वयंसेवकांच्या अथक परिश्रमामुळे पालखी सोहळ्यातील सेवा कार्य यशस्वीरीत्या पार पडले. समाजसेवा, मानवता आणि पोलीस प्रशासनाशी असलेल्या उत्कृष्ट समन्वयामुळे पीसकीपर्स वेल्फेअर फाउंडेशन – शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
🤝 संस्था भविष्यातही समाजहित, जनजागृती, सुरक्षा आणि मानवसेवा या उद्दिष्टांसाठी अशाच समाजोपयोगी उपक्रमांद्वारे अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिकायत