भोसरी : भोसरी पोलीस स्टेशन येथे पीसकीपर्स वेलफेयर फाउंडेशन – शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने पदाधिकारी व सभासदांना अधिकृत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भोसरी पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. नाथा घार्गे साहेब व सहायक पोलीस निरीक्षक मा. श्री. सोमनाथ टाफरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम पार पडला.
यावेळी भोसरी पोलीस स्टेशनच्या शांतता समितीच्या सदस्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना पुणे जिल्हा प्रमुख मा. सुजाता परदेशी यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. भावना थोरात यांनी उपस्थित पदाधिकारी व सभासदांना संस्थेच्या सामाजिक कार्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. रतनसिंह राजपुरोहित, पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख मा. पूजा अंत्रे, पुणे शहर अध्यक्षा मा. अर्चना मस्हके, पुणे जिल्हा मीडिया प्रमुख मा. रुपाली मानकर, बालसुरक्षा प्रमुख मा. उषा घुगे, पिंपरी-चिंचवड शहर महिला उपाध्यक्ष मा. लीना कुलकर्णी, पुणे शहर महिला उपाध्यक्ष मा. लता शिंदे, पिंपरी-चिंचवड शहर महिला संपर्क प्रमुख मा. सोनाली देशमुख, भोसरी-मोशी विभाग महिला अध्यक्षा मा. सरिता मोरे, भोसरी-मोशी उपाध्यक्ष मा. सचिन शिर्के, सचिव मा. अमरदीप सिरसट, काळेवाडी विभाग अध्यक्ष मा. बुवासाहेब अहिवळे, भोसरी-मोशी विभाग महिला सचिव मा. उज्वला जगताप, सहसचिव मा. साधना काळे, महिला संघटक मा. विमल खरात, पुणे जिल्हा सभासद मा. अपेक्षा गिरी, मा. निता वामन व मा. अक्षय गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🤝 पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय, शांतता व सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस मित्र परिवार सदैव कटिबद्ध!
🇮🇳 सेवा ही संकल्प • सुरक्षा ही उद्दिष्ट 🇮🇳
पीसकीपर्स वेलफेयर फाउंडेशन – शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांचा भोसरी पोलीस स्टेशन येथे विशेष उपक्रम
·
Admin User