Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Bhumkar Niwas, Near Datta Mandir, Ambegaon Budruk, Pune – 411046,Maharashtra, India Reg. No.U88900RJ2024NPL094234
Peacekeepers Welfare Foundation Peacekeepers Welfare Foundation
Activity

उत्कृष्ट तपास कार्याबद्दल पोलीस उपायुक्त मा.श्री कृषिकेश प्रदीप रावले साहेबांचा सन्मान!

·
Gita Classes
पीसकीपर्स वेल्फेयर फाउंडेशन – शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने पुणे शहर पोलीस परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त मा. श्री.कृषिकेश प्रदीप रावले साहेब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तक भेट देऊन त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. 📚🚔
🔹 ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण)’ या प्रतिष्ठित सन्मानाने मा. श्री कृषिकेश प्रदीप रावले साहेब यांना गौरविण्यात आले आहे.
🔹 एका संवेदनशील ऑनर किलिंग व दुहेरी हत्याकांडाच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उत्कृष्ट तपास करून १३ आरोपींचा पर्दाफाश करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
🔹 या उल्लेखनीय तपासामुळे ५ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्यापर्यंत प्रकरण प्रभावीपणे नेण्यात आले.
🏅 हा प्रतिष्ठित पदक सन्मान महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मा. श्री सदानंद दाते साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मा. कृषिकेश प्रदीप रावले साहेबांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
याच प्रशंसनीय कार्याबद्दल पीसकीपर्स वेल्फेयर फाउंडेशन – शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने त्यांचा सन्मान करून पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. उमेद सुथार आणि पुणे शहर सचिव श्री. शेखर पवार उपस्थित होते.
💐 मा. श्री. कृषिकेश प्रदीप रावले साहेब आणि पुणे शहर पोलीस दलाच्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन! 💐
🚔 पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचा सेतू अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर!
पीसकीपर्स वेल्फेयर फाउंडेशन – शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र)
🛡️ “सेवा ही संकल्प, सुरक्षा ही उद्देश्य”
शिकायत